Wednesday, March 15, 2017

शिवजयंती ..१९ फेब्रुवारीलाच का?

*नक्की वाचा*
*शिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी ला च का साजरा करावा !* ?

*शिवजयंतीची सुरवात भारतात सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनी केली.त्यांनी १९ फ़ेब्रुवारी १८६९ साली पुणे येथे प्रथम शिवजयंती साजरी केली.*

*शासनाने संशोधन करून २००१ मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली.*

या तारखेनंतर एक नवा वाद काही  मंडळींनी सुरु केला.

या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.

*तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते.*

म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च,२००३ ला २० मार्च,२००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.

*आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,  सावरकर,गांधी,नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र  इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती
तिथीप्रमाणे का ?

  *हिंदुंच्या  कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु  हिंदूंची  कालगणना तरी एक  आहे का ???  तर नाही !! .*

*भारतात  विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन  कालगणना  हिंदुंच्या आहेत.यातही बोंब अशी की   या   कालगणनेमध्ये   भारतातच  अनेक  बदल  आहेत*  .

*उदा.विक्रम संवतच्या  वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे.  तर  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे.तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने  पुढे आहे .म्हणजे तामिळनाडूत  ३०० वी  शिवजयंती असेल  तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.*

                याचा अर्थ इतकाच की *हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही.*

*व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.*

*जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी किती तारखेला जयंती येईल हे  पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.*

*आज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे.त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे.*

*काहींना  मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात.

*तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही*

ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे.*म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे.*

*पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी.*

*छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल.*

सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी. 

           *शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता कायमस्वरुपी यायला हवी.पण जर एकाच दिवशी महान *शिवजन्मोत्सव करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे.*

*१९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात.*

*मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो.शाळा, कोलेज,न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते.*

*म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल.*

*कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय ?

*संदर्भ  नक्की वाचाच !* *फक्त 19 फेब्रुवारी !!*
         छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे,शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशाख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०.सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर "जेधे शकावली"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर,फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली.जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.

             इ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती.[१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की,या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.

                इ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली,शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.

*जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रुत्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे.शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे.तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.* यावर संशोधन करून 19 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे.

( संकलन - भागवतराव सोनवणे)

गुढीपाडवा भाग. 2

गुढीपाडवा- चैत्रपाडवा

चैत्र शुक्लप्रतिपदेला पाडवा साजरा केला जातो. हा नववर्षारंभ असतो. हाच महिना निसर्गाच्या पुर्नजन्मचाही असतो. मानवाच्या आनंदाचा निर्सगाच्या आनंदाशी काही संबंध आहे का ते बघू..

चैत्र महिन्याआधी येणा-या माघ व फाल्गुन महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिराच्या तडाख्याने झाडांनी शरणागती पत्करून, आपली शस्त्रे म्यान केलेली असतात. निसर्ग स्तब्ध व निर्जीव भासत असतो. निष्पर्ण वृक्ष मनास भकास व उदास करतात. प्रेमीजन विरहाच्या कल्पनेने व्याकूळ होतात. शिशिराची ही भयानकता निसर्गाचे एक नकोसे व वेगळेच  रूप आपल्यापुढे आणते...
   रात्रीच्या गर्भात जसा उदयाचा उषःकाल असतो, त्याचप्रमाणे शिशिर संपून वसंताचे आगमन होते. याचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. कालीदास वसंताचे वर्णन करताना म्हणतो.....सर्व प्रिये! चारूतरं वसंते ।। अर्थात हे प्रिये, वसंतात सर्व काही रमणीय असते. कृष्णाने देखिल गीतेत, मी ऋतुत वसंत आहे असे म्हटले आहे. वसंतात झाडांना नवीन पालवी फुटते, विविध रंगांची, आकाराची फुले येतात.  निसर्ग मुक्तहस्ते रंगांची उधळण करत असतो. प्रेमिकांना पंचतत्वाचे हे मोहक रूप मिलनाचा, बहरण्याचा जणू संदेशच देते.

  निसर्गात, पुरातनकाळा पासून राहणारा मानव या बदलांनी रोमांचित झाला नसेल का? त्याच्याही मनाला नव पालवी फुटून,  आपणही या आनंद सोहळ्याचा भाग व्हावे असे त्यास नक्कीच वाटले असेल..
    अशा या निर्सगाच्या पुर्नजन्माचे स्वागत, वेगवेगळ्या रंगांच्या पताका, तोरणे, गुढया उभारूण करण्याची त्याची इच्छा म्हणजेतर गुढीपाडवा. नाही का?;

Tuesday, March 14, 2017

गुडीपाडवा भाग १

ब-याच दिवसांपासून सोशल मिडीयावर गुढी पाडव्या विषयी येणा-या विविध माहितीमुळे मनाची संभ्रमावस्था झाली होती. त्यातूनच या सणाच्या मागच्या मूळ उद्देषाचा शोध घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
    या प्रयत्नांतून जे निष्कर्ष निघतील, ते काही अंतिम सत्य नव्हे याची मला कल्पना आहे. आपण स्वतः चिकित्सक बुध्दी वापरून आपले मत बनवावे ही नम्र विनंती.
   या सणाविषयी माहिती घेण्यापूर्वी, काही संकल्पना स्पष्ट असणे गरजेचे आहे.
   हिंदू किंवा मराठी महिने १२. वर्षाची सुरवात चैत्र महिन्यापासून होते तर शेवट फाल्गून महिन्यात. प्रत्येक महिन्याचे 30 दिवस.
  30 दिवसांचे दोन भाग
पहिला पंधरवडा - शुक्ल किंवा शुध्द पक्ष याचा पंधरावा दिवस पौर्णिमा.
दुसरा पंधरवडा -  कृष्ण किंवा वदय पक्ष याचा पंधरावा दिवस अमावस्या.

दक्षिण भारतात अमावस्येनंतर नविन महिनासुरू होतो तर उत्तरेत पौर्णिमेनंतर..

प्रत्येक महिन्याचे मिळून एक ऋतू तयार होतो. असे एकूण ६ ऋतू आहेत. वसंत ऋतू चैत्र आणि वैशाख मिळून तयार होतो.

गुढीपाडवा चैत्र ऋतूत असल्याने तो आपल्या साठी महत्वाचा.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील, पुणे
७७९८९८११९९

 

Sunday, March 5, 2017

देश म्हणजे सहिष्णुता, दुस-याच्या मता बद्दल आदर

*मोदीजी, हा देश म्हणजे संघाची शाखा नव्हे!'*
               - निखील वागळे

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना भारतीय मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं ते काही ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत म्हणून नव्हे. जनता यूपीएच्या महाभ्रष्ट कारभाराला कंटाळली होती, तिला स्वच्छ प्रशासन आणि विकास हवा होता. मोदींच्या रुपाने लोकांना तो पर्याय दिसला. गुजरात मॉडेलचा गवगवा करण्यात आला आणि कधी नव्हे ते, भाजपला दिल्लीत बहुमत प्रस्थापित करता आलं. पण ही सत्ता आता भाजप आणि संघ परिवाराच्या डोक्यात गेलेली दिसते आहे. आपणच काय ते राष्ट्रभक्तीचे एकमेव ठेकेदार आहोत अशा आवेशात ही मंडळी वावरत आहेत आणि मन मानेल तसे फतवेही काढत आहेत. विरोधकांना देशद्रोही ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. शिशुपालाचे शंभर अपराध भरले तसे प्रत्येक सत्ताधार्‍याचे भरत असतात. इंदिरा गांधींच्या नशिबीही १९७७मध्ये तीच दुर्दशा आली होती. या इतिहासापासून काहीही न शिकता सत्तेचा दंडुका वापरून गुरू गोळवलकरांच्या विचारसरणीचा प्रसार करण्याचा उद्योग मोदी आणि कंपनीने चालवला आहे.

दिल्ली विद्यापिठातल्या रामजस कॉलेजात गेल्या आठवड्यात घडलेल्या घटना सत्ताधार्‍यांच्या याच मुजोर वृत्तीची साक्ष देतात. रामजस कॉलेजने आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये उमर खालिद या वादग्रस्त विद्यार्थ्याला बस्तरमधल्या परिस्थितीवर बोलायला आमंत्रित केलं होतं. उमर खालिद याच्यावर राजद्रोहाचा खटला चालू असल्यामुळे त्याच्या उपस्थितीला संघ परिवारातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विरोध केला. एवढंच नाही, तर सेमिनारच्या ठिकाणी अक्षरश: धुडगुस घातला. दगडफेकीने सुरू झालेली हिंसा प्राध्यापक-विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यापर्यंत जाऊन पोचली. आपण हिंसा केलेली नाही असं अभाविपचं म्हणणं आहे. पण उपलब्ध व्हिडिओ त्यांचा खोटेपणा उघड करतात. एकदा हिंसा भडकल्यावर ती दोन्ही बाजूंकडून होते. अभाविपने हात उचलल्यावर एआयएसए (आयसा) आणि एसएफआयचे विद्यार्थीही गप्प बसले नाहीत. प्रकरण चिघळतच गेलं. दोन्ही बाजूंनी भयंकर चिखलफेक सुरू झाली. गुरमेहेर कौर नावाच्या एका विद्यार्थिनीने ‘आय ऍम नॉट अफरेड ऑफ एबीव्हीपी’ असं फेसबुकवर लिहिल्यावर तिच्यावर सगळा संघ परिवार तुटून पडला. या मुलीचे वडील भारत-पाक संघर्षात शहीद झाले आहेत. वडिलांना गमावण्याचं दु:ख गुरमेहेरच्या मनात आहे म्हणूनच ती युद्धविरोधी आहे. आपल्या जुन्या फेसबुक पोस्टमध्ये ती म्हणते, ‘माझ्या मनात पाकिस्तानबद्दल राग होता. एकदा मी बुरख्यातल्या एका महिलेच्या अंगावर धावून जात होते. पण माझ्या आईने मला समजावलं आणि सांगितलं, माझे वडील पाकिस्तानमुळे नाही, तर युद्धामुळे मारले गेले.’ या पोस्टमधलं हे शेवटचं वाक्य काढून अभाविपने गुरमेहेरची प्रच्छन्न निंदा चालू केली. तिची तुलना दाऊद इब्राहिमशी करणार्‍या पोस्टही फिरवण्यात आल्या. एवढंच नाही, तर तिला मारण्याच्या, बलात्कार करण्याच्या धमक्याही सोशल मीडियावरून दिल्या गेल्या. ही मुलगी टेलिव्हिजन चॅनेलवर आली तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा वापर मी कसा करेन असं ती कळवळून विचारत होती. पण संघ परिवाराला तिच्याविषयी कोणतीही सहानुभुती वाटली नाही. ती अभाविपच्या विरोधात बोलते म्हणून तिची जाहीर बदनामी करण्यात आली. विरेंद्र सेहवागपासून रणदीप हुडापर्यंत सर्वांनी तिची कुचेष्टा करणारे ट्विट्स केले. ही मुलगी अभाविपच्या गुंडगिरी विरोधात निघालेल्या मोर्चात सामील होणार होती. पण प्रक्षोभक परिस्थिती पाहून तिने पाऊल मागे घेतलं. तिची आई आणि आजोबा तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. या प्रकरणात संघ परिवाराने जणू आपली सगळी संस्कृती गुंडाळूनच ठेवली होती. पुन्हा एकदा देशद्रोह, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, उदारमतवाद हे झिजून गेलेले वाद उकरण्यात आले. डाव्यांवर हल्ला करण्यासाठी ही संधी साधण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मोदी सरकारमधल्या ज्येष्ठ मंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ते शांत करण्याऐवजी त्यात तेलच ओतलं. अरुण जेटली, किरण रिजिजू यांनी केलेली विधानं पाहता ही माणसं जबाबदार पदावर बसायला लायक आहेत काय असा प्रश्न निर्माण होतो. देशाच्या सार्वभौमतेपुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला तर इलाज नाही असं सुचवणारं धोकादायक विधान जेटलींनी केलं. आणीबाणीची आठवण देणाऱ्या या सगळ्या घटना.

देशप्रेमाच्या नावावर सत्ताधारी जेव्हा आपली पापं लपवायला पाहतात तेव्हा विद्रोहाची ठिणगी भडकते. दिल्ली विद्यापिठातल्या या हिंसाचारामुळे तेच घडलं. पण ही घटना अलगपणे पाहून चालणार नाही. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संघ परिवार करत असलेल्या उपद्व्यापातली ही आणखी एक कडी आहे. आठवा जेएनयू, हैदराबाद विद्यापीठ किंवा एफटीआयआयमध्ये काय झालं. जेएनयूमध्ये कन्हैयाकुमारला खुनशीपणे देशद्रोहाच्या आरोपात अडकवण्यात आलं. आज पोलिसांनी केलेल्या चौकशीत कन्हैयाकुमार निर्दोष सिद्ध झाला आहे. उमर खालिद आणि इतरांवरचा खटलाही अजून पुढे सरकलेला नाही. सरकारच्या मनात असतं तर हा खटला शीघ्र गतीने चालवून त्यांनी निकालाचा आग्रह धरला असता. पण मोदी सरकार आणि संघ परिवाराला विरोधकांवर चिखलफेक करण्यात रस आहे, सत्य शोधनात नाही. म्हणूनच रोहित वेमुलाच्या दुर्दैवी आत्महत्त्येचा राजकीय तमाशा करण्यात आला आणि तो दलित नसल्याचा जावईशोधही लावण्यात आला. एफटीआयआयमधल्या आंदोलनकर्त्या मुलांवर प्रशासनाने अजूनही डूख ठेवला आहे आणि तिथे सावित्रीबाई फुले विद्यापिठात अभाविपची मुलं एसएफआयविरुद्ध आपली मस्ती दाखवत आहेत. कबीर कला मंचच्या कलाकारांनाही असंच हैराण करण्यात आलं. शीतल साठे खंबीर म्हणून ती मागे हटली नाही. डाव्या किंवा उदारमतवादी विचारसरणीला नेस्तनाबुत करून सत्तेच्या आधारे संघ विचाराचा झेंडा गाडण्याचा हा उघड प्रयत्न आहे. या संघर्षात देशाचं धु्रवीकरण होत आहे, विषारी वातावरण पसरत आहे याची खंतही मोदी आणि संघ परिवाराला वाटत नाही. बनारस हिंदू विद्यापिठात मोदी सरकारने नेमणूक केलेल्या संघवादी कुलगुरूंनी मुलींच्या इंटरनेट सर्फिंगवर बंदी आणली आणि मांसाहारालाही मनाई केली. आम्ही म्हणू तसे वागा, तसेच कपडे घाला आणि तसाच आहार घ्या हा अतिरेकी आग्रह यामागे आहे. काश्मिरमधल्या दहशतवाद्यांनी तिथल्या मुलींविरुद्ध असाच फतवा काही वर्षांपूर्वी काढला होता. एकीकडे शैक्षणिक संस्थांमध्ये भगवीकरणाचा असा धुमाकूळ चालला असताना दुसरीकडे अल्पसंख्यांकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे पद्धतशीर प्रयत्नही केले जात आहेत. मोहसीन शेखपासून अखलाखपर्यंत अनेक उदाहरणं याबाबत देता येतील. मोदींनी निवडणूक प्रचारात सुबत्ता आणण्याचं, रोजगार निर्माण करण्याचं आश्‍वासन दिलं होतं. ‘सब का साथ, सब का विकास’ ही त्यांची घोषणा होती. त्याऐवजी आपल्या विरोधी विचारांच्या महाविद्यालयीन तरुणांना देशोधडीला पाठवण्याचा हा देशव्यापी कार्यक्रम संघ परिवाराने हाती घेतला आहे. नेहमीप्रमाणे मोदी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाविषयी काहीही बोललेले नाहीत. केरळमध्ये कम्युनिस्ट आणि संघामधला हिंसाचार जुनाच आहे. दोन्ही बाजूंनी होणारे हल्ले निषेधार्ह आहेत. पण परवा संघाच्या एका नेत्याने केरळच्या मुख्यमंत्र्यांचा शिरच्छेद करण्यासाठी दोन कोटी रुपयांचं इनाम जाहीर केलं. त्यावरही आमचे हे छप्पन इंच छातीचे आदरणीय पंतप्रधान मुग गिळून गप्प आहेत. आपण निवडणुका जिंकू शकतो म्हणजे देशातल्या लोकांच्या आयुष्याशी कोणताही खेळ करू शकतो असं त्यांना वाटत असावं. उद्या उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांत भाजप विजयी झाला तर देशभरातला संघ परिवाराचा हा हैदोस अधिकच उग्र स्वरुप धारण करेल. भारतीय घटना बदलण्याची, गांधी- आंबेडकरांना भिरकावून गोळवलकर- हेडगेवार यांची प्रतिष्ठापना करण्याची हीच वेळ आहे असं आता या परिवाराला वाटलं तर नवल नाही. येत्या दोन वर्षांत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी अधिक वेगाने पुढे आली तर मला धक्का बसणार नाही. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सगळा देशच संघाची शाखा करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न आहे. गुजरातमधून ही प्रयोगशाळा सुरू झाली आणि आता दिल्लीच्या मार्गे देशभरात पसरत आहे.

देशाच्या संविधानावर प्रेम करणार्‍या सर्व नागरिकांनी सावध होण्याची हीच वेळ आहे. स्वातंत्र्य आंदोलनातून निर्माण झालेली भारतीय संघराज्याची कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रुपाने शब्दबद्ध केली. या कल्पनेला सुरुंग लावणारं तत्त्वज्ञान रा. स्व. संघाचं आहे. आजपर्यंत कधीही संघाने गुरू गोळवलकरांचं ‘विचारधन’ नाकारल्याचं जाहीर केलेलं नाही. त्यांना आता स्पष्टपणे सांगावं लागेल की, एक तर आंबेडकर स्वीकारा किंवा गोळवलकर. दोन्हीची भेसळ तुम्हाला करता येणार नाही. एक तर गांधी स्वीकारा किंवा गोडसे. दोघांचं तत्त्वज्ञान परस्परविरोधी आहे. त्यामुळे गांधींचा चरखा चालवताना गोडसेचं पिस्तुल हाती घेता येणार नाही. हा देश केवळ बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारेच चालेल. घटनेने नागरिकांना दिलेला कोणताही अधिकार इंदिरा गांधी खेचून घेऊ शकल्या नाहीत आणि ते नरेंद्र दामोदरदास मोदी या संघ शाखेवर तयार झालेल्या पंतप्रधानालाही करता येणार नाही. म्हणूनच नागरिक म्हणून आपल्याला मोदींना आणि संघ परिवाराला निर्वाणीचा इशारा द्यावा लागेल,'खबरदार, हा देशम्हणजे संघ शाखा नव्हे!'

         -निखिल वागळे

Friday, March 3, 2017

बाजीराव व स्वराज्य


   संजय वाधवा व निलांजना पुरकायस्थ यांची निर्मिती असलेल्या या मालिकेत मराठ्यांचा इतिहास आणि थोरले शाहू महाराज यांची जितकी म्हणून करता येईल, तितकी निंदानालस्ती केली आहे! या मालिकेत अत्यंत अनैतिहासिक आणि धडधडीत खोट्या प्रसंगांची रेलचेल तर आहेच, पण त्याहूनही घोर पातक म्हणजे थोरल्या शाहू महाराजांना औरंगजेबाच्या बरोबरीने व्हिलन दाखवल आहे
  
   मालिकेत बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई (बाजीरावाची आई) हे प्रतीशहाजी आणि प्रतीजिजाऊच दाखवले आहेत! हा जोक कमी म्हणून की काय? ते लहानग्या बाजीरावाला सतत 'तुझे स्वराज स्थापित करना है।' असा उपदेश करत असतात (हा मोठा जोक!!). प्रश्न असा आहे, की बाजीरावाला जर स्वराज्य स्थापन करायचे होते, तर मग छ. शिवरायांनी जे स्थापन केले होते, ते काय *बाबाजी का ठुल्लू* होते काय? याचे नव्याने संशोधन करावे लागेल!
  
   मुळात सत्य इतिहास असा आहे, की थोरले शाहू महाराज अर्थात छ. संभाजीराजेंचे पुत्र दुसरे शिवाजी (इस 1682 - इस 1749) हे सन 1707 पर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याच्याच नजरकैदेत होते. सुटकेसमयी त्यांचे वय 25 वर्षे होते. बाळाजी विश्वनाथाला त्यांनी आपल्या सेवेत सन 1708 मध्ये घेतले, तेव्हा ते 26 वर्षांचा होते, पण मालिकेत त्यांची आणि बाळाजीची भेट झाली, तेव्हा ते 16-17 वर्षांचे पोर दाखवले आहेत आणि ते वारंवार काहीतरी खलनायकी कृत्य करतात, बाळाजीला त्रास देतात, जनतेला त्रास देतात आणि बाळाजी विश्वनाथ भट स्वतः त्रास सहन करत जनतेला शाहू महाराजांच्या त्रासातून सोडवण्यासाठी झटतांना दाखवला आहे! थोरल्या शाहूंचा किती हा घोर अपमान! सत्यइतिहासाशी किती ही प्रतारणा!
  
साभार

*बाळासाहेब_गरुड*

Friday, February 3, 2017

*बाबरी, गडकरी व दांभिक समाज*

   बाबरी मशीद ज्या विचारसरणीने पाडली ती  विचारसरणी चांगली  का वाईट हे थोडा वेळ बाजूला ठेवू...
  बाबराने हिंदू धर्माची प्रतिके आक्रमण करून उध्वस्त केली,  त्या कृत्याचे परिमार्जन करण्यासाठी बाबरी पाडण्यात आली...

म्हणजे काय तर, हिंदु धर्मावर अन्याय, अत्याचाराचे प्रतिक उद्ध्वस्त करणे हे समस्त हिंदू संघटनांनी आपले कार्य मानले...असो...

आता आपण महाराष्ट्रात येवू,  *हिंदूपदपादशहा, गोब्राम्हणप्रतिपालक, धर्माभिमानी, धर्मरक्षक* म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते, त्या संभाजी महाराजांची बदनामी राम गणेश गडकरींनी आपल्या लिखानातून केली हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे, ते साहित्यही उपलब्ध आहे..

संभाजी महाराजांची म्हणजेच हिंदूप्रतिकांची बदनामी करणा-या प्रतिमांची, बाबरी प्रमाणेच प्रतिक्रिया उमटल्यावर, खरेतर समस्त हिंदूप्रेमी आनंदी व्हायला हवेत...

पण येथे नेमके उलटे घडते आहे,  बाबरी पाडण्याचे समर्थन करणारे गडकरींचा पुतळा पाडला म्हणून आक्रोश करीत आहेत...

*म्हणून विचार पडतो, की  संभाजी राजेंवरच हिंदूंच प्रेम बेगडी की बाबराविषयीची असूया खोटी.*

जो न्याय बाबराला तोच न्याय गडकरीला दिला तर आपण दुटप्पी का वागतो..

समस्त समाजाने आपल्या विचारांचे एकदा मंथन करावे...

विचार हे जात, धर्म, पंथ याप्रमाणे न बदलता लोकशाही मार्गाने व घटनात्मक पध्दतीने व्यक्त होणे लोकशाहीच्या हिताचे आहे असे वाटत नाही का?

गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199