Friday, February 3, 2017

*बाबरी, गडकरी व दांभिक समाज*

   बाबरी मशीद ज्या विचारसरणीने पाडली ती  विचारसरणी चांगली  का वाईट हे थोडा वेळ बाजूला ठेवू...
  बाबराने हिंदू धर्माची प्रतिके आक्रमण करून उध्वस्त केली,  त्या कृत्याचे परिमार्जन करण्यासाठी बाबरी पाडण्यात आली...

म्हणजे काय तर, हिंदु धर्मावर अन्याय, अत्याचाराचे प्रतिक उद्ध्वस्त करणे हे समस्त हिंदू संघटनांनी आपले कार्य मानले...असो...

आता आपण महाराष्ट्रात येवू,  *हिंदूपदपादशहा, गोब्राम्हणप्रतिपालक, धर्माभिमानी, धर्मरक्षक* म्हणून ज्यांचे वर्णन केले जाते, त्या संभाजी महाराजांची बदनामी राम गणेश गडकरींनी आपल्या लिखानातून केली हे सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे, ते साहित्यही उपलब्ध आहे..

संभाजी महाराजांची म्हणजेच हिंदूप्रतिकांची बदनामी करणा-या प्रतिमांची, बाबरी प्रमाणेच प्रतिक्रिया उमटल्यावर, खरेतर समस्त हिंदूप्रेमी आनंदी व्हायला हवेत...

पण येथे नेमके उलटे घडते आहे,  बाबरी पाडण्याचे समर्थन करणारे गडकरींचा पुतळा पाडला म्हणून आक्रोश करीत आहेत...

*म्हणून विचार पडतो, की  संभाजी राजेंवरच हिंदूंच प्रेम बेगडी की बाबराविषयीची असूया खोटी.*

जो न्याय बाबराला तोच न्याय गडकरीला दिला तर आपण दुटप्पी का वागतो..

समस्त समाजाने आपल्या विचारांचे एकदा मंथन करावे...

विचार हे जात, धर्म, पंथ याप्रमाणे न बदलता लोकशाही मार्गाने व घटनात्मक पध्दतीने व्यक्त होणे लोकशाहीच्या हिताचे आहे असे वाटत नाही का?

गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199