Friday, April 7, 2017

जागतिक आरोग्य दिन विशेष -नैराश्य

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन....चला बोलूया नैराश्याविषयी

वेताळ - नैराश्य म्हणजे काय रे भाऊ?

विक्रमादित्य - येडया वेताळा...दर वेळीस मला गंडवून निघून जातोस त्यानंतर माझ्या मनाची जी अवस्था होते त्यास नैराश्य म्हणतात..

वेताळ - निट सांग की?  का राजा झाला म्हणून, काय बी सांगतो का?

विक्रमादित्य - हे बघ, वेताळा मी काही मानसशास्त्रज्ञ नाही.. *तरीपण नैराश्य म्हणजे निराशा इतके नक्की* म्हणजे बघ अस की, आपल्या मनासारख न घडल्यामुळे जी मनाची अवस्था होते त्यास नैराश्य म्हणतात..

वेताळ - ऐ राजा....राम कृष्णाच्या आयुष्यात पण मनासारखे घडले नाही, मग सामान्य मानसाची तर गोष्टच सोड.. बर या निराशेवर मात करण्याचे काही उपाय आहे का तुझ्याकड..

विक्रमादित्य- आहे ना...पण तुला का सांगू?

वेताळ - तुझ्या मायला तुझ्या, दर येळीस मी सुटतो आणि दर येळीस तू मला धरतो, मग मला बी नैराश्य येत ना!  आता सांगतोस का, उडवू मुंडक.?

विक्रमादित्य - हे बघ वेताळा, आशा निराशा, जय पराजय हा जिवनाचा एक भाग आहे.. निराशा आली असता ती दूर करण्यासाठी मनाची उत्तम ठेवण हवी, मन स्वस्थ हवे, जिवना विषयी निकोप दृष्टीकोन हवा आणि गरज पडलीतर तज्ञ माणसाचा सल्ला हवा..

वेताळ - ये राजा, काय येडा समजलास का? 
..भूत आहे म्हणून काय बी सांगू नग!

अर,  निराशा आली, समस्या आली की देव देव करावा, तिर्थाटन करावे, कौल लावावा, नवस बोलावा, बकर कापाव, सत्यनारायण घालावा, गृह शांती, ग्रहशांती, नागबळी करावा, घराच्या वास्तुपुजा करावी, चायनिज फेंगशुई करावी.. तिरूपती बालाजी, मक्का, मदीना, सेंट मेरी आणि कुठ जाऊन नवस बोलला की झाल काम..

विक्रमादित्य - वेताळा, आज पर्यंत हेच झाल...माणस संकटाचा, समस्येचा कार्यकारण भाव न शोधता , त्याची जबाबदारी धर्म पालनात झालेल्या चुकीवर किंवा पूर्वजन्मा सारख्या थोतांडावर टाकून मोकळे झाले...त्याचा फायदा धर्मगुरूंनी घेतला, निरनिराळी कर्मकांड सांगून गरीबांना लुटल.व बुडत्याचा पाय खोलत तसा गरीब आणखी खोल रूतत गेला..

वेताळ - विक्रमा, काय बी मनाच ठोकू नको,
पुराण, ग्रंथप्रामाण्य, यज्ञयाग, परंपरा काय खोटी का मग..अरे, आपले सण बघ, देवता बघ, कर्मकांड बघ, सगळ कस 1 नंबर, 5000 वर्षाची परंपरा...आहे का कुठल्या देशाला?

विक्रमादित्य - वेताळा, भूत असून लय ज्ञान पाजळू नको! अरे, आपली उपनिषद, कृष्ण, चार्वाक, बुध्द, ज्ञानेश्र्वर, तुकोबा, गाडगे महाराज यांच तत्वज्ञान आपण अंगिकरलच नाही..निव्वळ फसत गेलो, काल्पनिक देवता यांची पूजा करून ज्ञान मिळणार आहे का? कर्मकांडातून समस्या सुटणार आहेत का? दक्षिणा, नवस यातून प्रगती होणार आहे का? जरा शांतपणे विचार कर वेताळा.

वेताळ - ये विक्रम, सकाळी सकाळी फुलटू झालास का? देव धर्माला नावे ठेवतोस, हिंदूद्रोही, देशद्रोही, पाकिस्तान समर्थक....बोल भारत माता की...जय.

विक्रमादित्य - वेताळा, मरायच्या आधी कोणत्या पक्षात होता?
अरे,  याच 'गप्पबसा ' संस्कृतीमुळे आपली हानी झाली...मी जे सांगितले ते माझे ज्ञान नसून सर्व संतांच्या ज्ञानाचे सार आहे..देव हा देवळात नसून, सत्कर्मात आहे...
तुकाराम बुवा म्हणतात

*जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधु तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा*...

वेताळा, देव देवळात नसतो..तो तुझ्या माझ्यातच असतो.

वेताळ- ये विक्या,, उगीच बधीर करू नकोस ..लेका...लय ज्ञान सांगतोस..मग सांग बर नैराश्य, समस्या येवू नये म्हणून काय कराव?

विक्रमादित्य.- ये वेताळा, विक्या काय, जरा सभ्यपणे बोल..अरे समस्या आली व सुटली नाही की नैराश्य  येत ना..मग समस्याच येवू नये म्हणून......

वेताऴ - काय?  सांग की?

विक्रमादित्य - सांगतो..नम्र भाषा, सदाचार, व्यसन व व्यभिचारापासून दूर राहणे, खोटे न बोलणे, अहिंसा, सतत कार्यमग्न राहणे, ज्ञानी माणसांचा सहवास, चिकित्सक बुध्दी, निर्भयता, चोखंदळपणा,, अनुकूल ठिकाणी वास्तव्य, बहुश्रुतता, सदाचार, अहंकार मुक्त असणे, हस्तकौशल्ये प्राप्त करणे, कुटुंबाची व राष्ट्राची काळजी, निर्रर्थक कर्मकांड पासून दूर राहणे, उदयोगव्यवसाय लक्ष देवून करणे, कामचुकारपणा न करणे, दान देणे, मैत्रीभावना जोपसणे, निसर्गाविषयी अनुकंपा, मित्र मंडळी व आप्तांना मदत, कामगारांवर विश्वास, निर्दोष कर्मे, आई वडील, व वरिष्ठांबद्दल आदर इ.मुळे जीवनात समस्या निर्माण होण्याचे प्रमाण कमी राहते....राहील का लक्षात,
वेताळा..

वेताळ - राजा, भारी बोललास..पण एवढ करून जर समस्या आलीच तर? बोल बोल...आहे का उत्तर

विक्रमादित्य - वेताळा चांगला प्रश्न..समस्या आली की खचून न जाता व निराश न होता समस्येचे आकलन करावे..समस्या आहे हे प्रथम मान्य करावे, जिथे समस्या तेथे उत्तरही असणार याची खात्री बाळगावी..दैववादी न होता..विविध पर्यायांची पडताळणी करावी..तज्ञांचा व जेष्ठांचा सल्ला घ्यावा..एवढे करूनही समस्या न सुटल्यास शांतपणे अनुकूल परिस्थितीची वाट पहात प्रयत्न सोडू नये...तथापी कधीही निरर्थक कर्मकांड करू नये..

वेताळ- राजा, तुझ्या हुशारीपुढे व भारतीय संतपरंपरेच्या, बुध्दांच्या, चार्वाकांच्या या विचारांमुळे माझे डोळे उघडले. पण

तु बोललास,  मी सुटलो...

हा हा हा
( वेताळ मनातल्या मनात..

देवाळतर देव नाही असे विक्रमादित्य संतांचा दाखला देवून म्हणतो, तर मग आता देवळातच लपतो,  मग त्याला सापडणारच नाही)

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
7798981199
Kurhadegirish@gmail.com

Tuesday, April 4, 2017

रामनवमी

राम नवमी

आज जरा रामाच्या बाजूने लढाई करावी म्हणतो .....रामाच्या ख-या इतिहासाची तोडमोड 
करणा-यां रावणाचे दहन करून खरा इतिहास समजावा म्हणून हे लंकादहन....

रामाच्या इतिहासावर चिकित्सक लोकांनी अनेक आक्षेप नोंदवले आहेत.. त्यातील 2 प्रमुख आक्षेपांची चर्चा करू....

आक्षेप 1...शंबूकाची हत्या
आक्षेप 2...सितेचा त्याग..

आक्षेप 1 शंबूकाची हत्या

कथा..वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये 73 ते 76 या चार सर्गातून शंबूक नावाच्या तपस्याची कथा आली आहे.

रामराज्यातील एका ब्राम्हणाचा मुलगा अकली मरण पावतो...तो ब्राम्हण मुलाला घेवून राज दरबारात गेला व रामापुढे मुलाचा मृतदेह ठेवून, रामराज्यात अकाली मृत्यू झाला याचा अर्थ "कोठेतरी पाप घडत आहे." असे म्हणाला. यानंतर नारदाने दरबारात येवून असे सांगितले की " हे राजा कृत युगात फक्त ब्राम्हणच तपश्र्चर्या करत,  कोण्या अब्राम्हणाला तपश्रर्या करता येत नसे. परंतु आता शुद्रही तपश्र्चर्या करू लागल्याने अधर्माचे पाऊल पृथ्वीवर पडून ब्राम्हण बालकाचा अकाली मृत्यू झाला." हे ऐकूण राम त्या शुद्राच्या शोधात निघतो. शंबुक नामक शुद्र तपश्र्चर्या करताना आढळून येतो...राम त्याची हत्या करतो..

अग्नीच्या नेतृत्वाखाली इंद्रासह देवांनी 'शाब्बास ! शाब्बास! ! या शब्दात रामाची स्तुती केली.

आक्षेप 2. सितेचा त्याग

रावणावरील विजयानंतर राम अयोध्येत पुन्हा येतो...सिता परपुरूषाकडे (रावणाकडे) राहिल्याने तिचा त्याग करावा असे धोब्याचे बोलणे ऐकूण , राम सितेचा त्याग करतो...

विस्तृत विवेचन..

वाल्मिकी रामायणात सात कांडे आहेत.'कांड' या शब्दाचा अर्थ विभाग. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किन्धाकांड, सुंदरकांड, युध्दकांड आणि उत्तरकांड..

पहिली पाच कांडे एखादया प्रसंगाच्या वर्णनानंतर समाप्त होतात. उदा. राम व सीता विवाहानंतर कसे शोभून दिसू लागले, याचे वर्णन बालकांडाच्या शेवटी आले आहे. तथापी युध्दकांड च्या समाप्तीच्या आधीचे 19 श्लोलकांचा अर्थ पाहिला असता,  तो असा खालील प्रमाणे आशय व्यक्त करतो..
जो कोणी हे रामायण मन लावून ऐकेल त्यास धनधान्य, पशु, पुत्र, संपत्ती प्राप्त होईल...

पहिल्या पाच कांडांची समाप्ती व युध्द कांडाची समाप्ती यांच्या आशयात प्रचंड फरक आहे. सहाव्या कांडाच्या शेवटी वाल्मिकीने लिहलेला ग्रंथ ऐकला असता कोणती फळे प्राप्त होतील हे सांगितले आहे.

रामायणकाराने असे का केले? या मागे काही संकेत,  परंपरा वा तत्व आहे?

फलश्रुतीचे स्वरूप

वस्तुतः संबंधित ग्रंथ ऐकणे, वाचणे, लिहून त्याच्या प्रती तयार करणे, अशा प्रतींचे दान करणे इ.कृतींमुळे संबंधित व्यक्तीला कोणती फळे मिळतात,  ते ग्रंथ समाप्त करताना नोंदविण्याची संस्कृत ग्रंथकारांची परंपरा आहे. फलश्रुती सांगितली म्हणजे ग्रंथ संपला. रामायणाची फलश्रुती 6 व्या कांडातच संपली आहे..म्हणजे रामायण 6 व्या कांडातच संपले..

मग प्रश्न निर्मिण होतो 7 वे कांड,  कोणी रचले व घुसडले.?

एखादया ग्रंथात मुळात नसलेला भाग नंतर लेखकाखेरीज दुस-या  कोणी घुसडण्याच्या क्रियेेला 'प्रक्षेप' म्हणतात. उत्तराकांड रामायणात घुसडण्यात आले म्हणून ते प्रक्षिप्त होय

शंबूकहत्या व सीतात्याग या घटना उत्तरकांडातीलच

शंबूकाच्या हत्येचा प्रसंग या उत्तरकांडात 73 ते 76 या सर्गात आहे, सीतेच्या त्यागाचा प्रसंग या उत्तरकांडातच 43 ते 48 या सर्गात आलेला आहे....

रामाने न केलेले कृत्य व वाल्मिकीने न लिहलेली गोष्ट कोणीतरी त्याच्या माघारी रामायणात 7 वे कांड जोडून घुसवली..न्यायाची बांधिलकी मानणारे कोणतेही न्यायालय या कृत्यासाठी रामाला जबाबदार ठरवू शकत नाही..

हे कोणी केले?

तथागत बुध्द व सम्राट अशोक यांनी स्त्रीयांनी व शुद्रांना ब्राम्हणांच्या बरोबरीचे अधिकार देवून क्रांती केली..एक युगप्रवर्तक कार्य केले...या कार्यामुळे वर्णव्यवस्थेतील विषमतेला प्रचंड सुरूंग लागला..असंख्य सामान्य व्यक्ती प्रतिष्ठेच्या स्थानापर्य़ंत पोहचल्या...ब्राम्हणी वर्चस्व क्षीण झाल्याने त्याचे समर्थक बेचैन झाले....पुष्यमित्र शुंगने वैदिक प्रतिक्रांती केली..अनेक बौध्द भिक्कूंची हत्याकरून वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला...याच काळात इतिहासाची तोडमोड करून अनेक ग्रंथ प्रक्षिप्त केले गेले..मनुस्मृतीचा उगम याच काळातला...

शुद्राला ज्ञानाचा अधिकार नाही, असे शास्त्रकाराचे मत पण ते समाजावर बिंबविण्यासाठी शुद्र शंबुकाची हत्या रामाच्या नावावर रचण्यात आली...

परक्याच्या घरात राहून देखिल जिणे चारित्र्याला डाग लागू दिला नाही, अशा स्त्रीला देखिल आपल्या घरात पुन्हा घेता कामा नये, हा नियम प्रतिक्रांती करणा-यांना समाजात रूजवायचा होता. पण त्यासाठी रामासारख्या लोकप्रिय व्यक्तीच्या माध्यमातून समाजापुढे जाणे आवश्यक होते. म्हणून रामाच्या नावावर सीतात्यागाची घटना घुसडण्यात आली...

ज्यांना शुद्रांचे व स्त्रीयांचे स्वातंत्र्य मान्य नव्हते,  त्यांनी आपले संकुचित विचार समाजावर लादण्यासाठी रामाच्या नावाचा उपयोग करून घेतला...

संदर्भ..डॉ. आ.ह.साळुंखे लेखन

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
7798981199
Kurhadegirish@gmail.com