Tuesday, April 4, 2017

रामनवमी

राम नवमी

आज जरा रामाच्या बाजूने लढाई करावी म्हणतो .....रामाच्या ख-या इतिहासाची तोडमोड 
करणा-यां रावणाचे दहन करून खरा इतिहास समजावा म्हणून हे लंकादहन....

रामाच्या इतिहासावर चिकित्सक लोकांनी अनेक आक्षेप नोंदवले आहेत.. त्यातील 2 प्रमुख आक्षेपांची चर्चा करू....

आक्षेप 1...शंबूकाची हत्या
आक्षेप 2...सितेचा त्याग..

आक्षेप 1 शंबूकाची हत्या

कथा..वाल्मिकी रामायणाच्या उत्तरकांडामध्ये 73 ते 76 या चार सर्गातून शंबूक नावाच्या तपस्याची कथा आली आहे.

रामराज्यातील एका ब्राम्हणाचा मुलगा अकली मरण पावतो...तो ब्राम्हण मुलाला घेवून राज दरबारात गेला व रामापुढे मुलाचा मृतदेह ठेवून, रामराज्यात अकाली मृत्यू झाला याचा अर्थ "कोठेतरी पाप घडत आहे." असे म्हणाला. यानंतर नारदाने दरबारात येवून असे सांगितले की " हे राजा कृत युगात फक्त ब्राम्हणच तपश्र्चर्या करत,  कोण्या अब्राम्हणाला तपश्रर्या करता येत नसे. परंतु आता शुद्रही तपश्र्चर्या करू लागल्याने अधर्माचे पाऊल पृथ्वीवर पडून ब्राम्हण बालकाचा अकाली मृत्यू झाला." हे ऐकूण राम त्या शुद्राच्या शोधात निघतो. शंबुक नामक शुद्र तपश्र्चर्या करताना आढळून येतो...राम त्याची हत्या करतो..

अग्नीच्या नेतृत्वाखाली इंद्रासह देवांनी 'शाब्बास ! शाब्बास! ! या शब्दात रामाची स्तुती केली.

आक्षेप 2. सितेचा त्याग

रावणावरील विजयानंतर राम अयोध्येत पुन्हा येतो...सिता परपुरूषाकडे (रावणाकडे) राहिल्याने तिचा त्याग करावा असे धोब्याचे बोलणे ऐकूण , राम सितेचा त्याग करतो...

विस्तृत विवेचन..

वाल्मिकी रामायणात सात कांडे आहेत.'कांड' या शब्दाचा अर्थ विभाग. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किन्धाकांड, सुंदरकांड, युध्दकांड आणि उत्तरकांड..

पहिली पाच कांडे एखादया प्रसंगाच्या वर्णनानंतर समाप्त होतात. उदा. राम व सीता विवाहानंतर कसे शोभून दिसू लागले, याचे वर्णन बालकांडाच्या शेवटी आले आहे. तथापी युध्दकांड च्या समाप्तीच्या आधीचे 19 श्लोलकांचा अर्थ पाहिला असता,  तो असा खालील प्रमाणे आशय व्यक्त करतो..
जो कोणी हे रामायण मन लावून ऐकेल त्यास धनधान्य, पशु, पुत्र, संपत्ती प्राप्त होईल...

पहिल्या पाच कांडांची समाप्ती व युध्द कांडाची समाप्ती यांच्या आशयात प्रचंड फरक आहे. सहाव्या कांडाच्या शेवटी वाल्मिकीने लिहलेला ग्रंथ ऐकला असता कोणती फळे प्राप्त होतील हे सांगितले आहे.

रामायणकाराने असे का केले? या मागे काही संकेत,  परंपरा वा तत्व आहे?

फलश्रुतीचे स्वरूप

वस्तुतः संबंधित ग्रंथ ऐकणे, वाचणे, लिहून त्याच्या प्रती तयार करणे, अशा प्रतींचे दान करणे इ.कृतींमुळे संबंधित व्यक्तीला कोणती फळे मिळतात,  ते ग्रंथ समाप्त करताना नोंदविण्याची संस्कृत ग्रंथकारांची परंपरा आहे. फलश्रुती सांगितली म्हणजे ग्रंथ संपला. रामायणाची फलश्रुती 6 व्या कांडातच संपली आहे..म्हणजे रामायण 6 व्या कांडातच संपले..

मग प्रश्न निर्मिण होतो 7 वे कांड,  कोणी रचले व घुसडले.?

एखादया ग्रंथात मुळात नसलेला भाग नंतर लेखकाखेरीज दुस-या  कोणी घुसडण्याच्या क्रियेेला 'प्रक्षेप' म्हणतात. उत्तराकांड रामायणात घुसडण्यात आले म्हणून ते प्रक्षिप्त होय

शंबूकहत्या व सीतात्याग या घटना उत्तरकांडातीलच

शंबूकाच्या हत्येचा प्रसंग या उत्तरकांडात 73 ते 76 या सर्गात आहे, सीतेच्या त्यागाचा प्रसंग या उत्तरकांडातच 43 ते 48 या सर्गात आलेला आहे....

रामाने न केलेले कृत्य व वाल्मिकीने न लिहलेली गोष्ट कोणीतरी त्याच्या माघारी रामायणात 7 वे कांड जोडून घुसवली..न्यायाची बांधिलकी मानणारे कोणतेही न्यायालय या कृत्यासाठी रामाला जबाबदार ठरवू शकत नाही..

हे कोणी केले?

तथागत बुध्द व सम्राट अशोक यांनी स्त्रीयांनी व शुद्रांना ब्राम्हणांच्या बरोबरीचे अधिकार देवून क्रांती केली..एक युगप्रवर्तक कार्य केले...या कार्यामुळे वर्णव्यवस्थेतील विषमतेला प्रचंड सुरूंग लागला..असंख्य सामान्य व्यक्ती प्रतिष्ठेच्या स्थानापर्य़ंत पोहचल्या...ब्राम्हणी वर्चस्व क्षीण झाल्याने त्याचे समर्थक बेचैन झाले....पुष्यमित्र शुंगने वैदिक प्रतिक्रांती केली..अनेक बौध्द भिक्कूंची हत्याकरून वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला...याच काळात इतिहासाची तोडमोड करून अनेक ग्रंथ प्रक्षिप्त केले गेले..मनुस्मृतीचा उगम याच काळातला...

शुद्राला ज्ञानाचा अधिकार नाही, असे शास्त्रकाराचे मत पण ते समाजावर बिंबविण्यासाठी शुद्र शंबुकाची हत्या रामाच्या नावावर रचण्यात आली...

परक्याच्या घरात राहून देखिल जिणे चारित्र्याला डाग लागू दिला नाही, अशा स्त्रीला देखिल आपल्या घरात पुन्हा घेता कामा नये, हा नियम प्रतिक्रांती करणा-यांना समाजात रूजवायचा होता. पण त्यासाठी रामासारख्या लोकप्रिय व्यक्तीच्या माध्यमातून समाजापुढे जाणे आवश्यक होते. म्हणून रामाच्या नावावर सीतात्यागाची घटना घुसडण्यात आली...

ज्यांना शुद्रांचे व स्त्रीयांचे स्वातंत्र्य मान्य नव्हते,  त्यांनी आपले संकुचित विचार समाजावर लादण्यासाठी रामाच्या नावाचा उपयोग करून घेतला...

संदर्भ..डॉ. आ.ह.साळुंखे लेखन

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
7798981199
Kurhadegirish@gmail.com

No comments:

Post a Comment