Wednesday, December 28, 2016

असहिष्णुता कि मानवता

दुसर्यांच्या विचार बद्दल आज समाजातील आदर, सदभावना हरवत चालली  आहे.

 आपल्या अनुभवाप्रमाणे, वाचनाप्रमाणे किंवा झालेल्या बर्या वाईट संस्काराप्रमाणे आपली जडणघडण होत असते. झालेली आपली वाढ हि कित्येक वेळा केवळ शारिरीकच असते.

मानसिक प्रगल्भता येण्यासाठी काही मूल्ये असतात ती जाणीवपूर्वक अंगी बनवावी लागतात.

 वाचन - आधुनिक विचारांचे वाचन , मनन , चिंतन आवश्यक आहे. कित्येक वेळा आपल्या धारणा ज्या आपण लहानपणापासून उरी बाळगलेल्या असतात त्याच्या विरोधी पण पटणारे विचार मान्य करण्याची मानसिक तयारी हवी. विचार जरी पटत नसतील तरी ते विचार वाचून दुसर्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करण्याचे मोठेपण हवे.

समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काहींचे विचार आपणास पटतात काहींचे पटत नाहीत. ज्यांचे विचार पटत नाहीत ते काही आपले शत्रू नसतात किंवा आपले वयक्तिक विरोधक हि नसतात.  ज्या प्रमाणे हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्याचंप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.


ह्या  गोष्टी आयुष्यात येण्यासाठी मुळातच वैचारिक प्रगल्भता हवी आणि ती येण्यासाठी आपली लोकशाही मुल्यांवर श्रद्धा हवी.

बाळासाहेब व शरद पवार एकमेकांचे राजकीय विरोधक पण वयक्तिक आयुष्यात चांगले मित्र बनून राहिले.

अशा प्रकारे जर आपण आपली वैचारिक प्रगती केली तर आपण नक्कीच एक आत्मिक आनंद अनभवू शकतो. एखाद्या गोष्टीच्या सर्व बाजूंचा; सर्व अंगानी विचार करता येतो. या समुद्रमंथनातून मग निव्वळ रत्ने बाहेर येतात जी आपल्या जीवनाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतात. आपले मस्तक उंचावून विचार मुक्त होतात. 

असेच संस्कार आपण आपल्या मुलांवर करणे आवश्यक आहे तरच आपणास शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, आंबेडकर, म.- फूले, तुकाराम  यांच्यावर हक्क सांगता येईल.



असे जीवन अनुभवला येण्यासाठी  आपण आजपासून कष्टपूर्वक सहिष्णुता अंगी बाणवूया व एका पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती करूया.

Tuesday, December 27, 2016

लक्ष्मीपूजन नक्की काय आहे

प्राचीन काळी लक्ष्मीपूजन या रात्री कुबेर पूजन करण्याची रीत होती.


 कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो.

दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करून पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता.

परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली. विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत.

 त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तीमध्ये कुबेर त्याची पत्नी इरितीसह दाखवला आहे.

यावरून असे दिसते की, प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निऋती या नावांनीही ओळखतात..

( आजही आपल्यात  सटवीपूजनाचा कार्यक्रम केला जातो )

 निवृत्ती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती बहुजनांची लक्ष्मी आहे, असे देव (ब्राह्मण) मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.

त्यामुळे मराठा समाजाने आपली नाळ कोठे आहे याचा नीट विचार करणे आवशक आहे.

संदर्भ काही भाग संजीव वेलणकर पुणे. 


Monday, December 12, 2016

धर्माचा उगम व विकास भाग 2

कालावधी 2००० वर्षाच्या आसपास 


या आधी  आपण बघितले कि पुरातन काळात वारा, अग्नी, पाऊस या निसर्गातील शक्तींची विधवंसक रूपे बघून व त्याचा कार्यकारणभाव न समजाल्याने भयकंपित होऊन प्राचीन मानवाने याच शक्तींना देव मानण्यास सुरवात केली. या मानवाने असा कार्यकारण भाव शोधून काढला कि या शक्तींना खुश करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे जेणे करून या शक्ती  खुष होवून आपणास संरक्षण देतील.

यातून मग यज्ञ संकृती चा उगम झाला. हे यज्ञ वारा, अग्नी, पाऊस इत्यादी शक्तींना खुष करण्यासाठी सुरु करण्यात आले.  याची हजारो उदाहारणे आपणास वेदां मध्ये सापडतात.

ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५३

मरुतो यद्ध वो बलं अचूच्यवितन //
गिरीरचुच्यवितन 

अर्थात 

हे मरुता, आपण आपल्या बलांनी लोकांना विचलिता करता  {घाबरवता }
पर्वतांना देखील विचलित करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.

आशा प्रकारे घाबरलेला मानव, या मरुताना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती करतो.

ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५6

अस्ति हि श्मा मदाय वः स्मसी शमा वयावेमेषम
विश्व चिदयुंर्जीवसे 

अर्थात 

हे मरुता आपण प्रसन्न व्हावे म्हणून तुमच्या साठी आम्ही हविद्राव्य तयार ठेवले आहे.
आम्हाला संपूर्ण आयुश्य,सुखद जीवन मिळण्यासाठी आम्ही तुमचे स्मरण करतो.

लेखकाचे दोन शब्द 
प्राचीन मानवाने याच शक्तींचा कार्यकारण भाव लक्षात न आल्याने देव मानण्यास सुरवात केली. यात त्या मानवांचा काही दोष नाही उलट त्यांच्या मुळे आज आपणास धर्माचा उगम व विकास कसा झाला याचे ज्ञान होते. परंतु त्याच क्रिया जर आपण धर्म म्हणून निव्वळ कर्मकांड म्हणून करणार असू तर मात्र आपण व ५००० वर्षा पूर्वीचा प्राचीन मानव यात काही फरकच राहणार नाही. निसर्गाने प्रत्येक मानवाच्या कवटीत एक मेंदू दिला आहे त्याचा वापर प्रगल्भ होण्यासाठी आणि विचार करण्यासाठी करावा. असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.देव, महाराज, बुवा, यांच्या नादी लागून आयुष्याचा महत्वाचा वेळ वाया घालवू नका. आपल्या मध्ये असलेल्या मनुष्त्वाचा पूर्णपणे विकास होण्यासाठी कोणत्याही अस्तितवात नसलेल्या पारलोकिक शक्तीची तुम्हाला काहीही गरज नाही. 
 तथापि मी किती देवभक्त हे जर तुम्हाला दाखवाचे असेल तर मग देवाचे फोटो शेयर करणे, पूजा, जयंत्या, , जेवणावळी इत्यादी गोष्टींची काही कमी नाही. चालुद्या तुमचा वर्षानुवर्षे गुलामीची परंपरा.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गाडगेमहाराज काय सांगून गेले,  या पेक्षा आपले ज्ञान खूपच अगाध आहे त्यामुळे न बोललेलेच बरे 











Friday, December 9, 2016

मराठा आतातरी जागा हो

ब्राम्हणांची निर्मिती ब्रम्हाच्या मस्तकापासून झाली व क्षञियांची त्याच्या हातापासून झाली असे ब्राम्हण ग्रंथात लिहले आहे

याचा अर्थ ब्राम्हणांनी स्वतःच्या बुध्दीचा वापर करायचा तर क्षञियांनी बुध्दीचा वापर न करता फक्त घाव घालावा.

त्याचे तंतोतंत पालन, स्वतःला क्षञिय म्हणवणारे मराठे करीत आहेत.

आपले कोण, परके कोण हेच त्यांना कळेनासे झाले आहे, नोटबंदी, मोदी, राहुल गांधी कोणताही विषय असो,  एकमेकाची गचंडी पकडायला तयारच.

बुध्दीचा वापर करायचाच नाही, समाजहिताच्या गोष्टी कोन सांगत असेल तर त्याची चेष्टा करायची.

धर्म म्हणजे काय याचे वाचन नाही की अभ्यास नाही. आला गुरवार, आला शनिवार की पळ या देवाला नाहीतर लाव बुवाचा बुक्का.

कोणत्या बुवाने,  महाराजाने कोणते तत्वज्ञान मांडले, कोणती गुलामगिरी दूर केली, कोणती सामाजिक चळवळ उभारली ना परिक्षण ना चिकित्सा.

स्वतःचे मस्तक व बुध्दी गहान ठेवायची व भजनी लागायचे, अनवाणी वारी करायची, चटई टाकून झोपायचे, कशी समाजात सुधारणा होणार.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात

तिर्थी धोंडापाणि देव रोकडा सज्जनी.

प्रबोधनकार म्हणतात

देवळात पुजा-याचे पोट असते.

गोतम बुध्द, संत गाडगे महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आ.ह. साळुंके यांनी कष्टकरून आपल्यापुढे ख-या धर्मीची तत्वे ठेवलि पण आपण इतके करंटे की वाचतच नाही, बरे कोण शहाणा सांगत असेल तर ऐकत नाही.

आपल कर्तुत्व शून्य, सरडयाची झेप कुंपनापर्यंत तशी आपली झेप छत्रपतींच्या जयजयकारा पर्यंतच.

पण प्रत्यक्ष विधायक कार्य करायची वेळ आली की आपण गळपटतो. मोर्चा वगैरे ठिक आहे पण तेच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे का.? आरक्षण मिळून सर्व प्रश्ऩ सुटतील का? शेतीच्या समस्या दूर होतील का?

मग उपाय काय करावा

उपाय सोपा आहे.

तुम्ही देव मानता का? या प्रश्नापेक्षा माणुसपण जपता का? हा प्रश्न स्वतःला विचारा.

तुम्ही ज्या देवाला, बुवाला, महाराजाला मानता तो अवैज्ञानिक सत्य तर सांगत नाही ना.

तुमचा उध्दार करायला कोणी जन्म घेणार नाही, उगीच अवताराची वाट बघू नका. राम, कृष्ण हे ही मानवच होते फक्त त्यांनी उच्चतम मानवी मूल्य गाठले.

त्यांचा विचार व आचारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता येतो का ते बघा.

मराठे तुम्ही आहातच जर बुध्द होता येतय का ते पहा.

अभिमानी तुम्ही आहातच जरा वाचनाचा व्यासंग धरून आंबेडकर होता येतय का ते बघा.

मस्तीमध्ये जगत आहातच पण जरा विद्रोही विचार करून म. फुले होता येतय का ते पहा.

मराठयांनो यातल काहीच नाही जमल तर निव्वळ माणूस म्हणून जगून पहा.

जग बदलेल तेव्हां बदलेल स्वतः मधला एक अवगुण बदलता येतो का ते पहा.

धर्माचा उगम व विकास


काल आपण बघितले कि पुरातन काळात वारा, अग्नी, पाऊस या निसर्गातील शक्तींची विधवंसक रूपे बघून व त्याचा कार्यकारण न समजाल्याने भयकंपित होऊन प्राचीन मानवाने याच शक्तींना देव मानण्यास सुरवात केली. या मानवाने असा कार्यकारण भाव शोधून काढला कि या शक्तींना खुश करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे.

यातून मग यज्ञ संकृती चा उगम झाला. हे यज्ञ वारा, अग्नी, पाऊस इत्यादी शक्तींना खुश करण्यासाठी सुरु करण्यात आले.  याची हजारो उदाहारणे आपणास वेदां मध्ये सापडतात.

ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५३
मरुतो यद्ध वो बलं अचूच्यवितन //
गिरीरचुच्यवितन

अर्थात

हे मरुता, आपण आपल्या बलांनी लोकांना विचलिता करता  {घाबरवता }
पर्वतांना देखील विचलित करण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे.

आशा प्रकारे घाबरलेला मानव, या मरुताना खुश करण्यासाठी त्यांची स्तुती करतो.

ऋग्वेद संहिता भाग १ सुक्त ३७ श्लोक ४५6

अस्ति हि श्मा मदाय वः स्मसी शमा वयावेमेषम
विश्व चिदयुंर्जीवसे

अर्थात

हे मरुता आपण प्रसन्न व्हावे

Sunday, December 4, 2016

पुरोगामी विचार संवाद

संवाद  व वाद यात काय फरक असावा?

संवादामुळे स्वतःचा व दुसर्याचा सन्मान, माणूसपण जपले जाते. दुसर्याचे ऐकूण घेण्याची व त्यावर विचारपूर्वक मनन, चिंतन करून निष्कर्षाप्रत येण्याची कला विकसित होते. मीपण दूर होतो.

संवादामुळे सत्याकडे वाटचाल होण्यास मदत होते. मनावरील जुन्या, कालबाहय विचारांची, निरर्थक क्रियांची जळमटे दूर होतात.

संवादासाठी आवश्यक बाबी-

संवाद करणा-या व्यक्तींना अभिनिवेश नसावा, शास्त्रीय पुरावे, घटना, अभ्युपगम, प्रगल्भता व्दारे तार्किक विवेचन असावे. संवादांती मान्य होणारे निष्कर्ष मोकळेपणे स्विकारून आपले मत व मन बदलावे.

Saturday, December 3, 2016

पुरोगामी विचार विद्रोह

विद्रोही विचारधारा हा पुरोगामी चळवळीचा प्राण आहे.


विद्रोही विचार म्हणजे नेमके काय या  बाबत थोडे विवेचन

विद्रोह म्हणजे थोडक्यात बंड. प्रस्थापित समाजरचना, विचार, धारणा, समज या विरुद्ध पुकारलेला वैचारिक लढा. माणूस हा जन्मजातच विद्रोही असतो तथापि आई वडील, समाज यांसकडून वेळोवेळी संस्काराच्या नावाखाली म्हणून जे काही केल जाते त्यामुळे त्याची वैचारिक पातळीवर कुचंबना होते व तो प्रश्न विच्रारण्याचे सोडून पूर्वापार चालत आलेले विचार, आचारच खरे मानू लागतो, तेथेच त्याचा प्रगतीचा मार्ग खंडित होतो व तो कितीही पुस्तकी पंडित झाला तरी तो वेठबिगारी सोडायला तयार होत नाही.  


विद्रोही विचार करणारे समाजात फार थोडे लोक असतात जसे श्री कृष्ण, महावीर, बुद्ध, चार्वाक, संतश्रेष्ठ तुकाराम, शिवाजी महाराज, ग्यालिलिओ,  महात्मा गांधी, महात्मा फूले, आंबेडकर, दाभोळकर, पानसरे , हमीद दलवाई इत्यादी.

परंतु याच लोकांमुळे समाजास वैचारिक दिशा मिळते, लढण्याची जिद्द निर्माण होते यातूनच पुन्हा महापुरुष निर्माण होतात.

आता आपणास विचार करण्याची वेळ आली आहे कि आपणास आपल्या मुलांना नक्की की बनवायचे  आहे. घाण्याचे बैल का वैचारिक गुलामगिरी लाथाडनारे लंबे रेस के घोडे.