Friday, December 9, 2016

मराठा आतातरी जागा हो

ब्राम्हणांची निर्मिती ब्रम्हाच्या मस्तकापासून झाली व क्षञियांची त्याच्या हातापासून झाली असे ब्राम्हण ग्रंथात लिहले आहे

याचा अर्थ ब्राम्हणांनी स्वतःच्या बुध्दीचा वापर करायचा तर क्षञियांनी बुध्दीचा वापर न करता फक्त घाव घालावा.

त्याचे तंतोतंत पालन, स्वतःला क्षञिय म्हणवणारे मराठे करीत आहेत.

आपले कोण, परके कोण हेच त्यांना कळेनासे झाले आहे, नोटबंदी, मोदी, राहुल गांधी कोणताही विषय असो,  एकमेकाची गचंडी पकडायला तयारच.

बुध्दीचा वापर करायचाच नाही, समाजहिताच्या गोष्टी कोन सांगत असेल तर त्याची चेष्टा करायची.

धर्म म्हणजे काय याचे वाचन नाही की अभ्यास नाही. आला गुरवार, आला शनिवार की पळ या देवाला नाहीतर लाव बुवाचा बुक्का.

कोणत्या बुवाने,  महाराजाने कोणते तत्वज्ञान मांडले, कोणती गुलामगिरी दूर केली, कोणती सामाजिक चळवळ उभारली ना परिक्षण ना चिकित्सा.

स्वतःचे मस्तक व बुध्दी गहान ठेवायची व भजनी लागायचे, अनवाणी वारी करायची, चटई टाकून झोपायचे, कशी समाजात सुधारणा होणार.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात

तिर्थी धोंडापाणि देव रोकडा सज्जनी.

प्रबोधनकार म्हणतात

देवळात पुजा-याचे पोट असते.

गोतम बुध्द, संत गाडगे महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, आ.ह. साळुंके यांनी कष्टकरून आपल्यापुढे ख-या धर्मीची तत्वे ठेवलि पण आपण इतके करंटे की वाचतच नाही, बरे कोण शहाणा सांगत असेल तर ऐकत नाही.

आपल कर्तुत्व शून्य, सरडयाची झेप कुंपनापर्यंत तशी आपली झेप छत्रपतींच्या जयजयकारा पर्यंतच.

पण प्रत्यक्ष विधायक कार्य करायची वेळ आली की आपण गळपटतो. मोर्चा वगैरे ठिक आहे पण तेच सर्व प्रश्नांचे उत्तर आहे का.? आरक्षण मिळून सर्व प्रश्ऩ सुटतील का? शेतीच्या समस्या दूर होतील का?

मग उपाय काय करावा

उपाय सोपा आहे.

तुम्ही देव मानता का? या प्रश्नापेक्षा माणुसपण जपता का? हा प्रश्न स्वतःला विचारा.

तुम्ही ज्या देवाला, बुवाला, महाराजाला मानता तो अवैज्ञानिक सत्य तर सांगत नाही ना.

तुमचा उध्दार करायला कोणी जन्म घेणार नाही, उगीच अवताराची वाट बघू नका. राम, कृष्ण हे ही मानवच होते फक्त त्यांनी उच्चतम मानवी मूल्य गाठले.

त्यांचा विचार व आचारांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता येतो का ते बघा.

मराठे तुम्ही आहातच जर बुध्द होता येतय का ते पहा.

अभिमानी तुम्ही आहातच जरा वाचनाचा व्यासंग धरून आंबेडकर होता येतय का ते बघा.

मस्तीमध्ये जगत आहातच पण जरा विद्रोही विचार करून म. फुले होता येतय का ते पहा.

मराठयांनो यातल काहीच नाही जमल तर निव्वळ माणूस म्हणून जगून पहा.

जग बदलेल तेव्हां बदलेल स्वतः मधला एक अवगुण बदलता येतो का ते पहा.

No comments:

Post a Comment