Wednesday, December 28, 2016

असहिष्णुता कि मानवता

दुसर्यांच्या विचार बद्दल आज समाजातील आदर, सदभावना हरवत चालली  आहे.

 आपल्या अनुभवाप्रमाणे, वाचनाप्रमाणे किंवा झालेल्या बर्या वाईट संस्काराप्रमाणे आपली जडणघडण होत असते. झालेली आपली वाढ हि कित्येक वेळा केवळ शारिरीकच असते.

मानसिक प्रगल्भता येण्यासाठी काही मूल्ये असतात ती जाणीवपूर्वक अंगी बनवावी लागतात.

 वाचन - आधुनिक विचारांचे वाचन , मनन , चिंतन आवश्यक आहे. कित्येक वेळा आपल्या धारणा ज्या आपण लहानपणापासून उरी बाळगलेल्या असतात त्याच्या विरोधी पण पटणारे विचार मान्य करण्याची मानसिक तयारी हवी. विचार जरी पटत नसतील तरी ते विचार वाचून दुसर्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करण्याचे मोठेपण हवे.

समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काहींचे विचार आपणास पटतात काहींचे पटत नाहीत. ज्यांचे विचार पटत नाहीत ते काही आपले शत्रू नसतात किंवा आपले वयक्तिक विरोधक हि नसतात.  ज्या प्रमाणे हाताची पाचही बोटे सारखी नसतात त्याचंप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.


ह्या  गोष्टी आयुष्यात येण्यासाठी मुळातच वैचारिक प्रगल्भता हवी आणि ती येण्यासाठी आपली लोकशाही मुल्यांवर श्रद्धा हवी.

बाळासाहेब व शरद पवार एकमेकांचे राजकीय विरोधक पण वयक्तिक आयुष्यात चांगले मित्र बनून राहिले.

अशा प्रकारे जर आपण आपली वैचारिक प्रगती केली तर आपण नक्कीच एक आत्मिक आनंद अनभवू शकतो. एखाद्या गोष्टीच्या सर्व बाजूंचा; सर्व अंगानी विचार करता येतो. या समुद्रमंथनातून मग निव्वळ रत्ने बाहेर येतात जी आपल्या जीवनाला एका वेगळ्याच उंचीवर नेवून ठेवतात. आपले मस्तक उंचावून विचार मुक्त होतात. 

असेच संस्कार आपण आपल्या मुलांवर करणे आवश्यक आहे तरच आपणास शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, आंबेडकर, म.- फूले, तुकाराम  यांच्यावर हक्क सांगता येईल.



असे जीवन अनुभवला येण्यासाठी  आपण आजपासून कष्टपूर्वक सहिष्णुता अंगी बाणवूया व एका पुरोगामी महाराष्ट्राची निर्मिती करूया.

No comments:

Post a Comment