Thursday, May 18, 2017

गीता

गीता......

भर कुरूक्षेत्रात,मधोमध रथ उभा करून अर्जुन हतबल झाला. शस्त्र टाकून त्याचे अवसानच गळाले....ज्यांना मारायचे ते आपले आप्त....मग त्यांना मारून प्राप्त करावयाचे साम्राज्य, सत्ता, आनंद काय कामाचा, असा विचार करून तो थांबला...

कृष्ण अर्जुनाचा सखा,सोबती व आता रथाचे सारथ्याच्या भूमिकेत होता...*रथाचे सारथ्य सोडून त्याने अर्जुनाच्या मनोरथाचे लगाम हात घेतले..

  गोंधळलेल्या अर्जुनाला प्रेमाने, प्रसंगी कटू बोलून सावरले, घडविले...सातशे  आठशे श्लोक सांगूनही अर्जुन निर्णय घेवू शकत नव्हता, कृष्णालाही निर्णय लादायचा नव्हता, कारण समजून, उमजून घेतलेला निर्णय आयुष्य घडवतो....

" कृष्ण रस्ता दाखवू शकतो, चालणे तूलाच करावे लागेल, कृष्ण दिशा दाखवू शकतो, मार्गक्रमण तूलाच करायचे आहे "

हे कृष्णाचे वचन, तळमळ बघून अर्जुनानेही विचार केला, कृष्णावर पूर्णपणे विसंबायचे ठरवले, आपल्या मनाचे दोर कृष्णाकडून परत घेवून, इतिहास घडवला....

मित्रांनो,

आपणही कित्येक वेळा समस्यांच्या कुरूक्षेत्रात उभे असतो, काही समस्या निर्माण झालेल्या असतात, काही आपण स्वतः केलेल्या असतात, अशा प्रत्येकवेळी मार्गदर्शन करण्यासाठी कृष्ण वाटेला येईलच असे नाही, पण कधी भेटलाच तर ऐका त्याचे, करा विश्वास त्यावर...कारण मार्गदर्शन जरी त्याचे असले तरी निर्णय आपणांसच घ्यायचा आहे...

चक्रव्यूहातून बाहेर पडणे, कृष्णाशिवाय शक्य नाही..
����������������������������

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
7798981199

No comments:

Post a Comment