गुरू होऊ नका, शिष्य बनू नका
विचित्र वाटलं ना? हजारो वर्षाची भारतीय पंरपरा रसातळाला नेणार वाक्य
मित्रांनो, निट विचार करा, या परंपरेमुळेच बरेच अनर्थ ओढवले आहेत.....पुरातन काळापासून गुरू बनण्याचा मक्ता एका विशिष्ट समाजालाच होता.....तर काही जातीतील विद्यार्थांना, स्त्रीयांना शिष्य बनून ज्ञान मिळविण्याचा अधिकारच नव्हता. कर्ण, एकलव्य हि ठळक उदाहरणे.
सध्या बाजारात गुरू शिष्यांचे पेव फुटलेत..या गुरूंपाशी ना ज्ञान ना विचार. फक्त संपत्ती, सत्ता, स्त्री यावर यांची नजर...कुंभमेळ्यात तर व्यसनाची हद्दच पार केली जाते...कोणत्या एॅन्गलने त्यांना गुरू, साधू म्हणावे...
याबाबतीत तुकारामांचे विचार पहाण्यासारखे आहेत
ते स्वतः म्हणत मला कोणी गुरू नाही कि माझा कोणी शिष्य नाही...सर्व प्राणीमात्र जर नारायणाचीच रूपे आहेत, तर गुरू शिष्यामध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ भेद कसा.....मेघ जसा सर्वांवर समान वृष्टी करतो तसं गुरूने सर्वांना मुक्त हस्ते ज्ञान दयावे...बुवांनी कोणताही मठ स्थापन केला नाही..
अधिकारी व्यक्तीकडून ज्ञान जरी मिळाले तरी तेवढयाने तुकाराम,शिवाजी, ज्ञानेश्र्वर जन्मत नसतात...स्वतःच असं एक चिंतन असावं, मनामध्ये मंथन व्हाव, विवेक, तारतम्य यातून मनाला नविन पालवी फुटते, शरीराचा प्रत्येक अणुरेणू मध्ये एक नविन तत्व संचारून, जणू आपला पुनर्जन्मच होतो.. यातूनच तुकारामाचा तुकारामतत्व व शिवाजीच शिवाजीत्व साकारते.....
याबाबत मन गुरू आणि शिष्य..माझा मिच व्यालो आणि स्वतःच्या पोटाला आलो हे विचार बघण्यासारखे आहेत
गिरीश प्रभाकर कु-हाडे
7798981199
No comments:
Post a Comment