Saturday, May 13, 2017

मृगजळ

*मृगजळ*

वाळवंटात प्रवास करणा-या माणसाला प्रचंड तहान लागते..

मग त्याला पाण्याची आस निर्माण निर्माण होते....

उन्हाने तापलेल्या वाळवंटात उष्णतेने दूर कुठे तरी वाफा तयार होतात, त्याचापाणी असल्यासारखा भास होतो आणि प्रवासी जीवाच्या आकांताने धावू लागतो.

पडतो, ठेचाळतो, तरीपण ऊर फुटस्तोवर धावतो....जवळ जाऊन पहातोतर पाणी नाहीच. नुसता आभास.  परत दूरवर नजर टाकतो, तर तेच चित्र. *फक्त आभास आणि परत भ्रमनिरास*...

.......मित्रांनो आयुष्याचे असेच आहे बघा...    *जे आपल्याकडे नाही ते मिळावे व ते मिळाल्यावर सुख प्राप्त  होईल असे वाटून मनुष्य धावत सुटतो*...

फक्त एकच ध्यास सुख. हवेहवेसे, मुलायम, मखमली....धावता, धावता त्यास हवे ते मिळतेही पण ते निव्वळ मृगजळच ठरते...काही दिवस मन रमते....नंतर पुन्हा नवे सुख आकर्षित करते...मग परत धावाधाव...

हया मृगजळामागे धावू नका..असे आपले अनुभवी मित्र, सहकारी,आप्त, प्रियजन ओरडून सांगत असतात. पण आपल्या त्याकडे लक्षच नसते..नव्हे ,त्यांची बडबड, पोटतिडीक आपल्यासाठी *निगेटिव्हिटी* असते.

आणि

सुखाच्या  मृगजळाची वास्तविकता जेव्हा कळते, तेंव्हा मात्र आपण आयुष्यात एकटेच असतो, ना मित्र, ना आप्त, ना प्रेमी,  ना सहकारी...असते फक्त आणि फक्त निराश, एकाकीपण आणि अगतिकता.

म्हणून मित्रांनो, प्रगती करा, विजयी व्हा, पण सुख म्हणजे काय हे समजून घ्या...सुख असे बाहेर मिळणार नाही...ते आतच शोधावे लागेल...

*तूज आहे तुज्यापाशी पर तू जागा चुकलासी*...

सुखाच्या राज्यात नेमके उफराटे राजकारण असते.... *तुम्ही जेवढे इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न कराल तितके तुम्हाल सुख मिळेल*...आठवतोय ना  न्यूटनचा नियम. *Action and Reactions are equall and opposite.*

म्हणून क्रिया करण्यापूर्वी विचार करा, सल्ला घ्या..आपली क्रिया ही इतरांना सुखी करणारी, न्याय, प्रामाणिक असेल तर नक्कीच सुख तुमच्याघरी पाणी भरेल....

पण स्वतःच्या व कुटुंबाच्या सुखाच्या शोधात स्वार्थी होऊऩ, इतरांना उध्वस्त करणार असाल, फसवणार असाल, हक्क हिरावून घेणार असाल तर मात्र कितीही धावलात तरी *सुख हे मृगजळच राहणार.*

सावध व्हा, *आयुष्य म्हणजे जुगार नाही कि प्रयोगशाळा नाही.*

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
7798981199

No comments:

Post a Comment