Wednesday, March 15, 2017

गुढीपाडवा भाग. 2

गुढीपाडवा- चैत्रपाडवा

चैत्र शुक्लप्रतिपदेला पाडवा साजरा केला जातो. हा नववर्षारंभ असतो. हाच महिना निसर्गाच्या पुर्नजन्मचाही असतो. मानवाच्या आनंदाचा निर्सगाच्या आनंदाशी काही संबंध आहे का ते बघू..

चैत्र महिन्याआधी येणा-या माघ व फाल्गुन महिन्यात शिशिर ऋतू असतो. शिशिराच्या तडाख्याने झाडांनी शरणागती पत्करून, आपली शस्त्रे म्यान केलेली असतात. निसर्ग स्तब्ध व निर्जीव भासत असतो. निष्पर्ण वृक्ष मनास भकास व उदास करतात. प्रेमीजन विरहाच्या कल्पनेने व्याकूळ होतात. शिशिराची ही भयानकता निसर्गाचे एक नकोसे व वेगळेच  रूप आपल्यापुढे आणते...
   रात्रीच्या गर्भात जसा उदयाचा उषःकाल असतो, त्याचप्रमाणे शिशिर संपून वसंताचे आगमन होते. याचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. कालीदास वसंताचे वर्णन करताना म्हणतो.....सर्व प्रिये! चारूतरं वसंते ।। अर्थात हे प्रिये, वसंतात सर्व काही रमणीय असते. कृष्णाने देखिल गीतेत, मी ऋतुत वसंत आहे असे म्हटले आहे. वसंतात झाडांना नवीन पालवी फुटते, विविध रंगांची, आकाराची फुले येतात.  निसर्ग मुक्तहस्ते रंगांची उधळण करत असतो. प्रेमिकांना पंचतत्वाचे हे मोहक रूप मिलनाचा, बहरण्याचा जणू संदेशच देते.

  निसर्गात, पुरातनकाळा पासून राहणारा मानव या बदलांनी रोमांचित झाला नसेल का? त्याच्याही मनाला नव पालवी फुटून,  आपणही या आनंद सोहळ्याचा भाग व्हावे असे त्यास नक्कीच वाटले असेल..
    अशा या निर्सगाच्या पुर्नजन्माचे स्वागत, वेगवेगळ्या रंगांच्या पताका, तोरणे, गुढया उभारूण करण्याची त्याची इच्छा म्हणजेतर गुढीपाडवा. नाही का?;

No comments:

Post a Comment