Friday, March 3, 2017

बाजीराव व स्वराज्य


   संजय वाधवा व निलांजना पुरकायस्थ यांची निर्मिती असलेल्या या मालिकेत मराठ्यांचा इतिहास आणि थोरले शाहू महाराज यांची जितकी म्हणून करता येईल, तितकी निंदानालस्ती केली आहे! या मालिकेत अत्यंत अनैतिहासिक आणि धडधडीत खोट्या प्रसंगांची रेलचेल तर आहेच, पण त्याहूनही घोर पातक म्हणजे थोरल्या शाहू महाराजांना औरंगजेबाच्या बरोबरीने व्हिलन दाखवल आहे
  
   मालिकेत बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई (बाजीरावाची आई) हे प्रतीशहाजी आणि प्रतीजिजाऊच दाखवले आहेत! हा जोक कमी म्हणून की काय? ते लहानग्या बाजीरावाला सतत 'तुझे स्वराज स्थापित करना है।' असा उपदेश करत असतात (हा मोठा जोक!!). प्रश्न असा आहे, की बाजीरावाला जर स्वराज्य स्थापन करायचे होते, तर मग छ. शिवरायांनी जे स्थापन केले होते, ते काय *बाबाजी का ठुल्लू* होते काय? याचे नव्याने संशोधन करावे लागेल!
  
   मुळात सत्य इतिहास असा आहे, की थोरले शाहू महाराज अर्थात छ. संभाजीराजेंचे पुत्र दुसरे शिवाजी (इस 1682 - इस 1749) हे सन 1707 पर्यंत म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत त्याच्याच नजरकैदेत होते. सुटकेसमयी त्यांचे वय 25 वर्षे होते. बाळाजी विश्वनाथाला त्यांनी आपल्या सेवेत सन 1708 मध्ये घेतले, तेव्हा ते 26 वर्षांचा होते, पण मालिकेत त्यांची आणि बाळाजीची भेट झाली, तेव्हा ते 16-17 वर्षांचे पोर दाखवले आहेत आणि ते वारंवार काहीतरी खलनायकी कृत्य करतात, बाळाजीला त्रास देतात, जनतेला त्रास देतात आणि बाळाजी विश्वनाथ भट स्वतः त्रास सहन करत जनतेला शाहू महाराजांच्या त्रासातून सोडवण्यासाठी झटतांना दाखवला आहे! थोरल्या शाहूंचा किती हा घोर अपमान! सत्यइतिहासाशी किती ही प्रतारणा!
  
साभार

*बाळासाहेब_गरुड*

No comments:

Post a Comment