Thursday, March 16, 2017

*हे फतवे कधी थांबणार*..


विषय- नहिद अफ्रिन या आसाम मधील १६ वर्षाच्या १० वी तील गायिकेला गाण्यापासून रोखण्यासाठी मौलवींकडून फतवा काढण्यात आला.

तुम्ही, आम्ही गाणे म्हणू शकतो का? नाही ना. कारण गायन ही एक नैसर्गिक देण आहे, कला आहे, प्रयत्न व उपजत गुण याचा एक अत्युच अविष्कार आहे.

अकबराच्या दरबारात तानसेन जेव्हा, गाणी म्हणायचा  तेंव्हा दिवे पेटायचे, पाऊस पडायचा असे म्हटले जाते. यातील अतिशयोक्तीचा भाग बाजूला केला तरी गायनाची शक्ती आपल्या लक्षात येईल. इस्लाममधीलच एक सुफी परंपरा आहे, त्यात संगीताच्या तालावर अल्लाशी तादम्य पावण्याची योजना असते, या सुफी परंपरेवर देखिल कट्टरवादयांनी पाकिस्तान हल्ला केला.

मी म्हणेल,तसाच धर्माचा अर्थ लावायचा व आम्ही सांगू तोच धर्म व तीच कृती करायची. असा कट्टरवाद भारतात चालू देणे व अशा कट्टरवादाचा निषेध न करणे म्हणजे भारताच्या सहिष्णू विचारसरणीचा पराभवच आहे..

बर हा कट्टरवाद इस्लाममध्ये वाढत असला तरी तो सर्वच धर्मात मूळ रोवतो आहे..

याचे कारण समाजातील सुशिक्षित, नेते, पुढारी, सिनेकलाकार, मिडिया यांचे मौन..

चला तर, उठा, सर्वच धर्मातील असहिष्णुते विरूध्द संघर्ष करू. तुमचा धर्म, तुमच्या घरात, देवळात, मशिदित.. रस्त्यावर व समाजात फक्त घटनेचे व मुक्त मानवतेचे राज्य निर्माण करूया.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील

No comments:

Post a Comment