Friday, March 17, 2017

चैत्र पाडवा व शिवपार्वती भाग. ४

शिव व पार्वती यांचे महत्व वेदपूर्व काळापूर्वीपासून विख्यात आहे. सिंधू संस्कृतीतील उत्खननात पशुपती शिवाच्या व मातृदेवतेच्या मूर्ती सापडल्या आहेत..

भारतीय समाजाचा विचार करता, पार्वती व शंकर यांना आदि मातापिता मानण्याची श्रध्दा फार मोठ्या प्रमाणात आढळते.

कालीदास, तसेच अनेक प्राचीन ग्रंथांच्या आधारे आपण हे म्हणू शकतो की, या आदय दांपत्याचा विवाह चैत्र प्रतिपदेच्या( पाडवा) दिवशी निश्चित होवून तो,  त्यानंतर तीन दिवसांनी पार पडला.

या दिवसांची तयारी करताना ग्रंथात म्हटले आहे, सर्व शहरच एक कुल असल्यासारखे कामाला लागले, राजरस्त्यांच्या बाजूला चिनी रेशमी वस्त्रांचे ध्वज रांगेने उभारले होते, जागोजागी तेजाने चमकणारी तोरणे होती. सगळीकडे आनंदोत्सव होता.

(चिनशी भारताचा व्यापार प्राचीन असून,  तो ज्या रस्त्याने चालायचा त्यास सिल्क रोड म्हणत)

महाभारत ते १४ व्या शतकातील विविध ग्रथांनी वर्षारंभाच्या पहिल्या दिवशी पार्वती पूजेच्या प्रसंगी व शिवपार्वती विवाह प्रसंगी ध्वज वा ध्वजा उभारण्याची कृती सांगितलेली आहे...

यावरून एक लक्षात येते की पाडवा हा सऩ अतिपुरातन असून, तो आदय मातापित्यांच्या विवाहाच्या आनंदाचे प्रतिक आहे.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
७७९८९८११९९
Kurhadegirish@gmail.com

No comments:

Post a Comment