Friday, March 17, 2017

बांबूचा गुढीसाठी वापर शुभ कि अशुभ

बांबू व पाडवा

पाडव्याची गुढी उभारताना, बांबूच्या काठीचा वापर केला जातो. व्यक्ती मृत पावल्यावर  बांबूचा तिरडीसाठी वापर केला जातो, याच कारणाने बांबू अशुभ समजून वापर गुढीसाठी न करण्याचा सोशल मिडीयावरचा संदेश वाचला.

बांबू... बांबू हा एक गवताचा प्रकार, तो झुडपाने वाढतो, याची उगवण 50 अंश उत्तर अंक्षाक्षाच्या दरम्यान पूर्व आशिया, उत्तर ऑस्ट्रेलिया, हिमालय, दक्षिण भारत, आसाम इ भागात मध्यम ते अति पर्जन्य प्रदेशात होते.

शुभ-अशुभ

शुभ अशुभ हा कोत्या, सडक्या मनाचा खेळ आहे, कित्येक वेळा आपल थोबाड देखिल काही जण अशुभ मानतात, म्हणून काय आपण जीव देत नाही. क्षणभर शुभ अशुभ खर मानला तर, बाबूंच्या बाबतीत अशुभापेक्षा शुभ मानण्याचे प्रमाण जगात जास्त आहे.. चीन, जपान  इतकेच कशाला भारतात देखिल फेंगशुई थोतांडानुसार बांबूची  बाऊलमधील रोपे काही जण शुभ संकेत म्हणून घरात ठेवतात. ते जाऊ दया,  कृष्णाची बासरी पण बाबूंचीच होती. जगतगुरू तुकोबा म्हणतात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे.. बांबूपासून अनेक लोकोपयोगी वस्तू तयार होतात. कोवऴ्या बांबूचा आहारात देखिल उपयोग केला जातो. असा स्मशाना पर्यंत साथ देणारा बांबू खर तर एक निर्सगाचे वरदान मानला पाहिजे ना की अशुभ वस्तु.

बांबू लवचिक असतो, वजनाने हलका असतो. मेलेल्या माणसाचे वजन उचलायला त्याच्या या गुणाचा उपयोग होतो. नाहीतर आज काल खाऊन खाऊन वजन वाढलेली असतात, त्यात परत तिरडीसाठी बांबू ऐवजी लाकड वापरली तर, खांदेक-यांना देखिल लवकरच उचलण्याची वेळ यायची, विनोदाचा भाग सोडला तर

गुढी उंच उभी केली जाते, वा-यामुऴे ती हेलकावे खाते, पण बांबूच्या हलक्या व लवचिक पणामुळे ती आपला दरारा टिकवून ठेवते, पाडव्यानंतर परत त्याच बांबूचा कपडे वाळत घालायला वापर होतो, ते वेगळच..

असा हा बहुगणू बांबू , गुढीसाठी नक्कीच लाभदायक आहे

No comments:

Post a Comment