Tuesday, March 21, 2017

गुढी पाडवा. भाग 6

शक व शालिवाहन शक

इसवी सन ७८ पासून ' शके ' कालगणनेचा प्रारंभ झाला. शकाची म्हणजेच नव्या वर्षाची सुरवात चैत्र शुक्ल प्रतिपदेला होते. सौर पध्दतीच्या कालगणनेनुसार वर्षाची नोंद करण्याच्या बाबतीत भारत सरकारने 'शके' कालगणनेचा स्विकार केला.

भारतीय संस्कृतकोशामध्ये शालिवाहन शकाविषयी पुढील माहिती मिळते..

शक कालाचा संस्थापक शक राजा कोण व तो कोठे होऊन गेला, याविषयी विव्दानांत मतभेद आहेत. पुष्कळांच्या मते तो कुशाणवंशी कनिष्क असावा. हे राजे शकवंशी नसून कुशाणवंशी होते. या कालगणनेचा पुढे शक राजांनी उपयोग केल्याने तिला शक हे नाव पडले असावे..

कुशाणवंशाचा अस्त झाल्यावर उ.भारतात या कालगणनेचा हळूहळू संकोच झाला. दक्षिणेत मात्र चालुक्य राजांनी शकसंवताचा उपयोग चालू ठेवला.

शालिवाहन हे नाव इ.सनाच्या तेराव्या शतकात त्याच्याशी जोडले गेले. हा शालिवाहन नेमका कोण, याविषयी अभ्यासक काही ठामपणे सांगताना दिसत नाहीत. तथापि,  तो कुंभाराचा मुलगा होता, ही लोकधारणा खुप महत्वाची आहे.

जाता जाता--शक हे परकीय व आक्रमक असताना त्यांनी चालू ठेवलेला  शक मानने काहींना विचित्र वाटू शकते...पण शक जरी परकीय असले तरी भारतीय समाजात इतके मिसळून गेले की त्यांना परके मानने आता शक्य नाही..

काहीही असो...भारतात दिर्घ काळपासून प्रचलित असलेल्या शकाचे नवे वर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेला म्हणजे पाडव्याला सुरू होते.

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
७७९८९८११९९
Kurhadegirish@gmail.com

No comments:

Post a Comment